लोटे परिसरात बिबट्याची दहशत
लोटे पीरलोटे दीक्षितवाडी नजिकच्या परिसरात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याचा संचार वाढला असून आजपर्यंत येथील शेतकर्यांच्या चार जनावरांचा फडशा या बिबट्याने पाडला आहे. यापैकी केवळ एका गायीचा पंचनामा वनविभागाकडून केला गेला असून अन्य तीन जनावरांच्या पंचनाम्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यांना अद्यापही वेळ मिळाला नाही. परिणामी शेतकर्यांमध्ये दहशत पसरली असून शेतीच्या कामांना जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत.
www.konkantoday.com