
लेखा परिक्षकांची संघटना स्थापन
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमाणित लेखा परिक्षकांची संघटना स्थापन करून नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
जिल्हा नगर वाचनालय सभागृहात शासकीय लेखा परिक्षकांची असोसिएशन स्थापनेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या नुतन कार्यारिणीत अध्यक्षा श्रीमती स्वाती टिळेकर, उपाध्यक्षा श्रीमती शर्वरी नेने, अभय जाधव, वैभव सुर्वे, सचिव वैभव सावंत, खजिनदार गजानन दळी, सदस्यपदी संदीप डाफळे (लांजा-राजापूर), एम.आर. पाटील (खेड), सौ. कर्देकर (दापोली), जगदीश सकपाळ (गुहागर), श्रुती मोरे, संजय गांगण (रत्नागिरी) यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com