मुंबई-गोवा चौपदकरणाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवड्याभरात सुरु

मुंबई -गोवा महामार्गावर पडलेल्या खड्‌ड्यांमुळे या मार्गाचा वापर करणार्‍या रहिवाशांना तसेच वाहनचालकांना होणार्‍या त्रासवर तीव्र नाराजी व्यक्त करीत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदारांची चांगलीच कान उघाडणी केल्यानंतर या महामार्गावरच्या डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम आठवडयाभरात सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन कंत्राटदारांनी पालकमंत्री यांना दिले.

गेल्या वर्षभरापासून मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार विविध कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले. या कंपन्यांना त्या त्या रस्त्यांचे काम करणार्‍या कंत्राटदारांना तेथील रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. विविध दौर्‍यावेळी तसेच गणेशोत्सवावेळी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री यांनी चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदाराबरोबर बैठका घेऊन या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासमवेतही यासंदर्भात पालकमंत्री वायकर यांनी मंत्रालयात बैठका घेतल्या होती.

कोकणात मुसळधार पडणार्‍या पावसामुळे या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला असता त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. स्थानिक जनतेनेही या महामार्गावरील खड्‌डयांमुळे होणार्‍या त्रासाची माहिती पालकमंत्री वायकर यांना दिली. याची गंभिर दखल घेत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सोमवारी सकाळी मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंत्राटदारांची खेड येथील निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला खेडचे प्रांत सोनावणे त्याचबरोबर खेड तसेच चिपळुण येथील कंत्राटदार हजर होते. या बैठकी कशेळी ते चिपळुण लोटे या महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्‌ड्यांवर पालकमंत्री वायकर यांनी तीव्र शब्दात कंत्राटदारांची कानउघाडणी केली. आजपासूनच (४ नोव्हेंबर २०१९) या महामार्गावरील डांबरीकरणाचे तसेच पॅचवर्कचे काम सुरू करण्याचे निर्देश वायकर यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार कशेळी ते चिपळुण लोटे महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आठवड्याभरात सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button