मासळी मिळत नसल्याने पारंपारिक मच्छिमार अडचणीत
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा पांढरा समुद्र किनारपट्टीलगत पारंपारिक मच्छिमार असून हे पारंपारिक मच्छिमार समुद्रात पारंपारिक होडीमधून रापण मारतात. मात्र गेले काही दिवस या मच्छिमारांना रापणीत मासे मिळणेच बंद झाल्यामुळे हे मच्छिमार अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे त्याना रोजगारच मिळत नसल्याचे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
www.konkantoday.com