बिघडलेल्या वातावरणाचा हापूसच्या हंगामावर परिणाम होण्याची शक्यता
दिवाळी सुरू झाली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या आठवडाभरापूर्वीपासून ठिकठिकाणी पडणारा परतीचा पाऊस व त्यात येवून गेलेल्या क्यार चक्रीवादळाने वातावरण बिघडून टाकले आहे. अजूनही नव्या महा चक्रीवादळाचे सावट कायम आहे. त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील हापूस आंबा हंगाम संकटात सापडणार असल्याची मोठी चिंता जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना सतावत आहे.
अलिकडे वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्याचे परिणाम यावर्षीच्या आंबा हंगामाला सहन करावे लागणार असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जाते.
www.konkantoday.com