बसमध्ये चढताना महिलेच्या अडीच लाख रुपये किमतीच्या दागिन्याचा डबा चोरला
गुहागर मुंबई या एसटी गाडीने प्रवास करणाऱ्या शारदा खेडेकर या महिलेच्या अडीच लाख रुपये किमतीच्या दागिन्याचा डबा दोन महिलांनी चोरल्याची घटना पोलादपूर बसस्थानकात घडली आहे
यातील शारदा खेडेकर या गुहागर मुंबई गाडीने आपल्या पतीसह प्रवास करीत होत्या ही बस पोलादपूर येथे बसस्थानकात जेवणासाठी थांबली त्यावेळी सर्वजण जेवणासाठी खाली उतरले बसमध्ये परत चढत असताना दोन महिलांनी शारदा यांना धक्का दिला या महिलेनेच शारदा यांच्या पर्समधील दागिन्यांचा डबा लांबवला या डब्यांमध्ये अडीज लाखाचे सोन्याचे दागिने होते . काही वेळाने शारदा यांच्या हा प्रकार लक्षात आला तोपर्यंत चोरट्या महिला फरार झाल्या होत्या याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com