नादुरूस्त गाड्यांमुळे एस.टी. चालकांनी केले चक्काजाम आंदोलन
नादुरूस्त गाड्यांमधून प्रवाशांच्या आणि स्वतःच्या जीववावर उदार होवून सेवा बजावणार्या खेड एस.टी. बसस्थानकात एस.टी. चालकानी चक्काजाम आंदोलन छेडले.आगाराच्या प्रवेशद्वारावरच संतप्त एस.टी. चालकांनी ठिय्या आंदोलन केल्याने दिवसभर एस.टी. वाहतूक ठप्प झाली होती. एस.टी. गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अनेकवेळा नादुरूस्त एस.टी. मधून प्रवास करावा लागतो. बहुतांशी एस.टी. पावसाळ्यामध्ये गळक्या असतात. अशा अनेक अडचणींचा सामना करत प्रवाशांना सेवा देणारे वाहक, चालकांना नेहमीच प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सर्व प्रवासी नेहमीच होणार्या या त्रासाबद्दल राग हा वाहक व चालकावरती काढतात. मात्र आज वाहक चालकांच्या संयमाचा तोल सुटून त्यांनी चक्क आंदोलनाचा पवित्रा घेतला. खेड महामंडळाचे गलनाथ कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघाले.
www.konkantoday.com