गोदानाविषयी माहिती देणारे मोबाईल ऍप
भारतीय संस्कृतीत गोदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. गोदान का आणि कसे करावे, त्यासाठी कुठे व कोणत्या प्रकारच्या गायी मिळतात, या संबंधित सविस्तर माहिती देणारे गोदान नावाचे मोबाईल ऍप तालुक्यातील रायपाटण येथील नवजीवन विकास सेवा संस्थेने विकसित केले आहे.
या ऍपमुळे गोदान करू इच्छिणार्यांना गोदानाच्या महत्वासह त्यासाठी लागणार्या गायी, त्याचे महत्व ऍपच्या माध्यमातून एका क्लिकवर समजून घेता येईल. पितांबरी प्रॉडक्टस् प्रा. लि. कंपनीच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या गोदान ऍपचा वसुबारसच्या शुभमुहूर्तावर पितांबरी समुहाचे व्यवस्थापकीय सचालक रवींद्र प्रभूदेसाई यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला.
www.konkantoday.com