खल्वायनची दिवाळी पाडवा विशेष मैफल सुमधुर स्वरांनी रंगली
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी सायं. ५ वा. नेहमीप्रमाणेच गुरूकृपा मंगल कार्यालय, पर्याची आळी रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रायोजित या मैफलीमध्ये मुंबईतील नव्या पिढीतील युवा गायक स्वानंद भुसारी, कु. प्राजक्ता काकतकर यांच्या शास्त्रीय गायनाने श्रोत्यांचा आनंद द्विगुणित झाला.
www.konkantoday.com