
हर्णै येथील नुकसानग्रस्त मच्छीमारांना शिवसेनेतर्फे आ.योगेश कदम यांच्याकडून पाच हजार रुपयांची मदत
दापोलीः- दापोलीचे आ.योगेशदादा कदम यांनी हर्णै पाजपंढरी येथील नुकसानग्रस्त मच्छीमारांना दिलेले मदतीचे वचन मुदतीआधीच पूर्ण करुन दाखवले असून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वाला आ.योगेशदादा कदम वचनबध्द असल्याचे दिसून आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
दीपावलीच्या आधी अरबी समुद्रात घोंगावलेल्या क्यार वादळाच्या तडाख्याने हर्णै बंदरात सुरक्षितपणे नांगरुन ठेवलेल्या डिंग्या समुद्रात वाहून गेल्या. याची तात्काळ दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे यांना मुंबईत भेटण्यास गेलेल्या आ.योगेश कदम यांनी आपला दौरा अर्धवट सोडून मतदार संघातील हर्णै-पाजपंढरी मच्छीमार वस्तीची पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्त मच्छीमारांना शिवसेनेकडून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येतील अशाप्रकारची आ.कदम यांनी घोषणा केली होती. त्यानुसार शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हर्णै बंदरात स्वतः आ.योगेश कदम यांनी उपस्थित राहून नुकसानग्रस्त डिंग्या मालकांना धनादेशाचे वाटप केले.
हर्णै, पाजपंढरी, उटंबर, आडे आणि बुरोंडी येथील मच्छीमारांच्या वाहून गेलेल्या ७३ डिंग्यांचे फिशरीजच्या परवाना अधिकारी श्रीम. साळवी आणि स्थानिक तलाठी अमित शिगवण यांनी पंचनामे करुन शासनास आपला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार शिवसेनेकडून आ.योगेश कदम यांच्याहस्ते नुकसानग्रस्त उपस्थित मच्छीमारांना प्रत्येकी पाच हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जि.प.माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती श्री.अण्णा कदम, उद्योजक श्री.शैलेश कदम, श्री.रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण, सौ.रोहिणी दळवी, श्री.भगवान घाडगे, जिल्हा नियोजन सदस्य श्री.निलेश शेठ, श्री.सुनिल दळवी, श्री.संजय महाडीक, श्री.मोहन शिगवण आदी पदाधिकारी तसेच हर्णै-पाजपंढरी संस्थेचे चेअरमन श्री. किरण दोरकुळकर, श्री.बाळकृष्ण पावसे, श्री.दत्ताराम पेडेकर, श्री.काशिनाथ पावसे, श्री.रामचंद्र खोपटकर, श्री.भगवान चोगले, श्री.सोमनाथ पावसे, श्री.हेमंत चोगले, श्री.देवचंद पावसे, श्री.लिलाधर चोगले, श्री.रामचंद्र पावसे, श्री.रामचंद्र पाटील, श्री.पांडुरंग भोईनकर, श्री.यशवंत खोपटकर, श्री.गोपिचंद चोगले, श्री.गजानन चौलकर, श्री.रघुनाथ चौलकर, श्री.हरिश्चंद्र पाटील, श्री.महेश पाटील, श्री.जनार्दन रघुवीर, श्री.गणेश रघुवीर, श्री.जितेंद्र पावसे, श्री.कमलाकर खोपटकर, श्री.हनुमान पावसे, श्री.प्रकाश चोगले, श्री.कृष्णा दोरकुळकर, श्री.गणेश चोगले, श्री.दत्ताराम चोगले, श्री.निळकंठ रघुवीर, श्री.मनोहर पावसे, श्री.राकेश भोईनकर, श्री.अनंत चोगले, श्री.रामा चुनेकर, श्री.यज्ञेश चुनेकर आणि निलम चोगले आदींसह मच्छीमार व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.




