सावधान रत्नागिरीकरांनो, रत्नागिरीत फसवणुकीचा नवीन प्रकार?
रत्नागिरीत अनेक फसव्या कंपन्यांनी रत्नागिरीकरांना याआधी गंडा घातलेला आहे.त्यातच आता लकी ड्रॉच्या माध्यमातून गंडा घालण्याचा नवीन प्रकार समोर आला आहे.सध्या रत्नागिरी व शहर परिसरात सनगरे नामक एक मुलगी लकी ड्रॉ कुपन घेऊन प्रत्येक घराघरांमध्ये जात आहे.शंभर रुपायचे कूपन खरेदी केल्यास तुम्ही एक हजार रुपयांमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करू शकता असा दावा ती करते.त्यासाठी ती श्री सद्गुरू एंटरप्रायजेस हे नाव असलेले कूपन व दुकानाचा पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर देते.प्रत्यक्षात त्या पत्यावरती गेल्यास त्या ठिकाणी श्री सद्गुरू एंटरप्राइजेस या नावाचे दुकानच अस्तित्वात नसून नुसते सद्गुरू एंटरप्राइजेस असे दुकान आढळले. दुकानामध्ये चौकशी केली असता असा कोणताही प्रकारचे कुपन आम्ही प्रसिद्ध केले नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.सनगरे नामक व्यक्तीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती फोन उचलत नसल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी शहरातील बऱ्याच बिल्डिंग व घरांमध्ये अशाप्रकारे कूपन विकली गेली असल्याची शक्यता आहे. तरी रत्नागिरीकरांनो अशा कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवताना योग्य प्रकारे माहिती व खात्री करून घेऊनच पैसे गुंतवल्यास आपली फसवणूक होणार नाही.
www.konkantoday.com