
राज्यात तिन दिवस अतिवृष्टीचा इशारा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नव्या चक्रीवादळामुळे सहा नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर हे तिन दिवस राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळामुळे समुद्रात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मच्छीमारांनी नौका किनाऱयावर आणाव्यात अशीही सूचना करण्यात आली आहे .
www.konkantoday.com