राजकारणात काहीही घडू शकते – पालकमंत्री रविंद्र वायकर
राजकारणात कोणी कुणाचा नसतो.. राजकारणात काहीही घडू शकते असे मत पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर असताना व्यक्त केले. भाजपकडून सेनेला अपेक्षित प्रस्ताव अद्याप आलेला नसल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे रत्नागिरीत शेतकर्यांच्या दौर्यासाठी आले आहेत. त्या निमित्ताने रत्नागिरीत आलेले पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ता स्थापनेबाबतची माहिती दिली. सध्या कॉंग्रेसला सोबत घेवून जाण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत वायकर यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी सूचक विधान केले. राजकारणात कोण कुणाचा शत्रू नसतो. राजकारणात काहीही घडू शकते. आदित्य ठाकरे नक्कीच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com