रत्नागिरी जिल्ह्यातील बस स्थानकाच्या आवारातील पानटपर्‍या कायमस्वरूपी बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असणार्‍या एस.टी. बसस्थानकाच्या आवारातील पानाच्या टपर्‍या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती नुतन विभागनियंत्रक सुनिल भोकरे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार राज्य परिवहन बस स्थानकाच्या आवारामध्ये असणार्‍या तंबाखूजन्य पदार्थांचे विक्री करणार्‍या टपर्‍या बंद करण्याचे आदेश उच्चस्तरावरून झाल्यानंतर त्याची रत्नागिरी जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात ९ पानाच्या टपर्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या जागेमध्ये असुन तया सर्व बंद केल्या जाणार आहेत. त्यातील ८ पानटपर्‍या बंद करण्यात आल्या असून सात जणांचे ताबे घेण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button