
कोको कोला कंपनी विरुद्ध मोर्चा काढणाऱ्या 450 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील असगणी येथील अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जून) तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होताया प्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे यांच्यासह सुमारे ४५० जणांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामस्थांच्या रोजगाराबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आणि उपसरपंचांसह काही जणांवर केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.