अनधिकृत टाकलेले गतिरोधक, अद्याप काेणतीही कारवाई नाही
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथील पांढरा समुद्रमार्गे नवीनच बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर येथील झोपडपट्टीधारकांनी स्वखर्चातून कोणत्याही खात्याची परवानगी न घेता २ मोठे गतिरोधक टाकले आहेत. प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या अखत्यारित येणार्या या रस्त्यावरील हे गतिरोधक बंदर अधिकारी उगलमुगले यांनी काढून टाकण्याचे आदेश गुरूवारी दिले होते. मात्र चार दिवस उलटूनही अद्याप हे गतिरोधक जैसे थे आहेत.
www.konkantoday.com