
चिपळूण मध्ये आठ ते दहा वर्षांच्या मुलांची मोबाईल चोराची टोळी, चार मोबाईल लांबविले
चिपळूण येथील बाजारपेठेतील एका भांडी व्यावसायिकासह अन्य तीन दुकानातून मोबाईल चोरट्याच्या टोळीने मोबाईल चोरल्याचा प्रकार पुढे आला आहे.साधारण ८ ते १० वर्षांची लहान मुलांची टोळी दुकानात शिरल्यानंतर मोबाईल चोरत आहेत. या मोबाईल चोरीचे सीसीटीव्ही फूटेजचे फोटो सोशल मीडियावर व्हायलर होत असून, व्यावसायिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.काही दिवसांपासून शहर बाजारपेठेत एक मोबाईल चोरीची टोळी सक्रिय झाली आहे. त्यामध्ये ८ ते १० वर्षाच्या लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. या टोळीतील मोठी व्यक्ती एखाद्या दुकानात शिरल्यानंतर त्याच्या समवेत ही मुलेदेखील त्या दुकानात जात आहेत. मोठी व्यक्ती व्यावसायिकांना बोलण्यात गुंतवून ठेवून लहान मुले दुकान व्यावसायिकांची नजर चुकवून थेट मोबाईल चोरत आहेत. मागील दोन दिवसात खेर्डीसह चिपळूण बाजारपेठेत एकूण ४ चोरीच्या घटना घडल्या आहेत.