राजापूर मध्ये शिवसैनिकांच्यात अंतर्गत वाद पेटला, आपली बदनामी होत असल्याची आमदार राजन साळवी यांची पोलिसांत तक्रार
राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार राजन साळवी यांच्या विरोधात काल दुपारपासून त्यांची बदनामी होईल अशी पोस्ट फिरत असून त्यांमध्ये राजन साळवी यांचेवर गंभीर तसेच बदनामीकारक आरोप करण्यात आले आहेत.याची दखल घेऊन आमदार साळवी यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.एवढेच नव्हेतर ही पोस्ट व्हायरल व फॉरवर्ड करण्यामागे उद्योजक किरण सामंत व केतन पवार असल्याचा आरोप साळवी यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत केला आहे.यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून शिवसेनेतील अंतर्गत वाद उघड झाले आहेत.युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व अन्य शिवसेनेचा वरिष्ठ हे आज रत्नागिरी जिल्हय़ाच्या दौर्यावर येत असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघड झाल्याने ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com