
मेंढपाळांचे कळप पुन्हा कोकणात दाखल
दरवर्षी कोकणात मेंढपाळांचे शेकडो कळप दाखल होत असतात. यंदा तालुक्यात अधिक पाऊस पडत असल्याने मेंढपााळ त्यांच्या मेंढ्या, घोडे, कुत्रे, कोंबडे, गायीसह त्यांचे संसारोपयोगी साहित्य घेवून कुटुंबिय मुंबई गोवा महामार्गावरून मजलदरमजल करीत जीव धोक्यात घालून प्रवास करत कोकणात दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती, जेजुरी व दौंड परिसरातील शेकडो मेंढपाळांचे कळप कोकणात गेल्या अनेक पिढ्यांपासून सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात दाखल होतात.
www.konkantoday.com