
बॅटरी शॉर्ट झाल्याने दुचाकी पेटली ,तीन दुचाकीचे नुकसान
पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतल्यानंतर त्याची झळ अन्य दोन दुचाकींना बसल्याने त्यांचेही नुकसान झाल्याची घटना चिपळूण येथे घडली आहे चिपळूण ग्रीन पॅलेस येथे राहणाऱ्या तैासिया गोवळकर यांच्या मालकीच्या तीन दुचाकी आहेत पार्किंगमध्ये असलेल्या एका दुचाकीची बॅटरी शॉर्ट झाल्याने दुचाकीने पेट घेतला त्याची झळ अन्य दोन दुचाकींना लागल्याने तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे
www.konkantoday
com




