विनापरवाना वाळू वाहतूक करणार्यांवर गुहागरमध्ये कारवाई
तालुक्यातील परचुरी येथून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांवर तहसीलदार लता धोत्रे यांनी काल रात्री कारवाई करून दिड ब्रास वाळू जप्त केली आहे.
गेली काही दिवस परचुरी येथून विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक केली जात होती. याबाबत तहसीलदार लता धोत्रे यांना माहिती मिळाल्यावर काल रात्री विना परवाना वाहतूक करणाऱ्या (एम एच 08 – 5347) व (एम एच 08 डब्ल्यू 8191) या गाड्यांवरील चालक दिड ब्रास वाळू जप्त करून चालक उदय बागकर याला 50 हजार 400 रुपये दंड तर चंद्रकांत माने यास 25 हजार 400 रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे .
www.konkantoday.com