
लोटेतील प्रदूषण समस्येत मोठी वाढ
चिपळूण लोटे औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारचे कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात कायमच प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. त्यातच या परिसरातून प्रवास करताना कायम नाकावर हात ठेवण्याची वेळ सर्वांवर येते. अनेकदा दूषित पाणी खाडीत सोडले जात असल्याने मासे मरण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान होते. असे झाल्यावर काही संघटना आवाज उठवतात. मात्र त्यानंतर कोणताही ठोस उपाय न करताही त्या शांत बसतात. हे चित्र गेल्या अनेक वर्षापासून पहायला मिळत आहे.
www.konkantoday.com