रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग दुरूस्तीची मागणी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत.
आंबा घाटात तर रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या हद्दीत तर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्ड्ये आहेत हेच कळत नाही. या महामार्गाचे रूंदीकरण होणार आहे. परंतु रूंदीकरणाला वेळ लागणार असल्याने महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
www.konkantoday.com