
रत्नागिरीत नोव्हेंबरमध्ये सैन्यभरती
रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे तसेच गोवा राज्यासाठी सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरतीच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत १ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व माजी सैनिक, विधवा/माजी सैनिक तसेच इतर नागरिक, पाल्य यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com