
युतीचे सरकार येणार, भाजपचा प्रस्ताव
मुख्यमंत्री पद भाजपकडेच पाच वर्षे राहील, असे स्पष्ट करतानाच भाजपने आता शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदांची ऑफर दिली असून त्यावर येत्या दोन दिवसांत काय तो प्रतिसाद द्या, असा अल्टिमेटम दिला आहे. सध्या शिवसेनेचे सहा कॅबिनेट तर सात राज्यमंत्री आहेत. त्यात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद वाढवून देत शिवसेनेला १६ मंत्रिपदे दिली जातील आणि सहा अपक्षांसह ६२ आमदार असलेल्या शिवसेनेसाठी हा तोडगा सन्मानजनकच असल्याची भूमिका भाजपतर्फे मांडण्यात येत आहे
www.konkantoday
com