मिरकरवाडा झाेपडपट्टीला वनखात्याच्या नोटिसा
रत्नागिरी मिरकरवाडा येथील दीडशेहून अधिक झोपडीधारकांना वन विभागाने झोपड्या हटविण्यासाठी सात दिवसांची मुदतीची नोटीस दिली आहे. या नोटीशीनंतर बुधवारी शेकडो झोपडपट्टीवासियांनी नगरपालिकेवर धडक दिली. मात्र याबाबत न्यायालयाचा निर्णय वनविभागाच्या बाजूने असल्याने यात हस्तक्षेप न करता पुनर्वसनाबाबत शिवसेना पाठिशी राहिल अशी ग्वाही नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे.
www.konkantoday.com