सावर्डे येथील हॉटेलमध्ये बिलावरून वाद होऊन मारहाण
धर्मन्द्र गोरीलाल पवार मुळगाव (मध्यप्रदेश) व मुकुंद बाळकृष्ण शिंदे (मूळ गाव नांदगाव ता चिपळूण) हा दिनांक 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45 वाजता हॉटेल गुडलक येथे मद्यपान करण्यासाठी गेले होते. त्यांनी मद्यपान नंतर 2:40 वाजता दरम्यान आपले 640 बिल देण्यासाठी धर्मन्द्र पवार यांनी बार काउंटर वर असणाऱ्या मॅनेजर जवळ आपल्या कडील 2000 दिले. या वेळी फिर्यादी यांनी 600 दिले असे समजून मॅनेजर यांनी फिर्यादी कडे पुन्हा 40 मागितले, मात्र फिर्यादी पवार व शिंदे यांनी आपण 2000 हजार रुपये दिल्याचे सांगितले. याचा मनात राग धरून प्रितेश मोहिरे यांनी दोघांना हॉटेल च्या बाहेर जाण्यासाठी सांगितले फिर्यादी व सक्षीदार बाहेर निघण्यापूर्वी मोहिरे हॉटेल बाहेर येऊन लोखंडी रॉड घेऊन धर्मन्द्र पावर याच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोराने फटके मारून दुखापत केली.पवार याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सावर्डे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
www.konkantoday.com