
धबधब्याचा दगड डोक्यात कोसळून महाबळेश्वर येथे तरुणीचा मृत्यू
महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळे येथे पर्यटनास आलेल्या सोनाली गायकवाड (रा. भोर) या तरुणीच्या डोक्यात धबधब्यामध्ये वरून डोक्यात दगड पडल्याने मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या तरुणीला शिरवळ येथे उपचारा करीता हलवण्यात आले होते. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोनाली गायकवाड ही तरुणी मंगळवारी महाबळेश्वर येथे पर्यटनाकरिता आली होती. प्रतापगड मार्गावर असलेल्या मेटतळे येथील धबधब्यावर ती पर्यटनाचा आनंद लुटत होती.
www.konkantoday.com