
धामणदेवी गटात शिंदे गटाला खिंडार

गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी ५ नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी याच गावातील प्रभाकर मनवळ यांची कन्या डॉ. प्रीती मनवळ यांना धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून सर्वसंमतीने जाहीर करण्यात आले. ही सर्व मंडळी शिंदे गटात कार्यरत होती. पक्षाचे तालुका प्रमुख अंकुश काते यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभाग प्रमुख नंदू कांबळे, शाखाप्रमुख सुनील घाणेकर आदींनी हा पक्षप्रवेश घडवून आणला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पप्पू आंब्रे, तालुका सचिव संदीप कदम, विभाग प्रमुख राजेंद्र घाग, वहाब सेन, दिनेश शिरीषकर, निळीक शाखाप्रमुख मुजफर देसाई, सरपंच संतोष कान्हेरे, उपशाखाप्रमुख सुभाष जाधव,
संतोष हरमले, अरविंद जावळे, शंकर लंबाडे, संतोष बंदरकर, मेटे सरपंच श्री. जाधव आदी उपस्थित होते.




