चोरीस गेलेली बुलेट चासिस नंबरवरून सापडली
रत्नागिरीतील शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांची काही दिवसांपूर्वी चोरीस गेलेली बुलेट गाडी गाडीच्या चासिस नंबरवरून सापडली असून एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या चोरट्याला पोलिसांच्या साहाय्याने बुधवारी सायंकाळी सापळा रचून पकडण्यात आले आहे.रत्नागिरी शहरातील तेली आळी येथे राहणाऱ्या बिपीन बंदरकर यांची बुलेट गाडी त्यांच्या घरासमोरून काही दिवसांपूर्वी चोरीस गेली होती.कंपनीतील एका तरुणावर बंदरकर यांच्या मित्रांचा संशय होता. कंपनीमध्ये अपरेटिन्स वर काम करणारा तरुण अचानक बुलेट वापरू लागल्याने कंपनीतील लोकांचा त्याच्यावरचा संशय बळावला होता. त्यामुळे बंदरकर यांच्या बुलेटचा चासिस त्या तरुणांच्या बुलेटच्या चासिस शी जुळवून बघण्यात आला. दोन्ही नंबर एकच निघाले.त्यानंतर बुधवारी हा तरुण जेव्हा कंपनीत आला तेव्हा बिपीन बंदरकर आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन या तरुणाला कंपनीमधून बाहेर पडताना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
www.konkantoday.com