लाइफलाईन फाऊंडेशन रत्नागिरी ‘भाऊबीज भेट’ पुरस्काराने सन्मानित
संपूर्ण महाराष्ट्रात कार्य असलेल्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे यंदाच्या मानाच्या ‘भाऊबीज’ भेट (पुरस्काराने) लाईफलाईन फाऊंडेशन चा सन्मान झाला.सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे,कोकणातील अग्रणी युवक स्वयंसेवी संस्था,रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, जनजागृती अभियान, वृक्षारोपण, गरजूंना शैक्षणिक मदत, मतिमंद मुलांसाठी उपक्रम,सीड बॉल्स चे वितरण ,ब्लड ऑन कॉल उपक्रम, खारफुटी संवर्धन यासारखे अनेक सामाजिक उपक्रम लाइफलाइन फाउंडेशनने आजपर्यंत राबवले आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष तथा भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या हस्ते हा सन्मान लाइफलाईन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.हृषिकेश केळकर यांनी स्वीकारला.
www.konkantoday.com