महिलांच्या पींकथॉन उपक्रमाला चिपळुणात प्रतिसाद
सिनेकलाकार मिलिंद सोमण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पींकथॉन या महिलांच्या उपक्रमाला चिपळूण तालुक्यात प्रतिसाद मिळाला. येथील घरडा कॉलनीत हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. ही समस्या सार्वत्रिक असून त्यामुळे महिला मानसिक व शारिरिकदृष्ट्या कमजोर होऊ लागल्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिने कलाकार मिलिंद सोमण यांनी पुढाकार घेत पींकथॉन या उपक्रमाची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. त्याचा आधार घेत येथील घरडा कॉलनीतील जयश्री शेलार, सुचिता पाटील, स्वाती केसरे यांनी यासंदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी योगा, सुर्यनमस्कार, झुंबा डान्स, एरोबिक्स यासारख्या माध्यमांचा वापर करून महिलांनी मानसिक व शारिरीक क्षमतांचे संवर्धन केले.
www.konkantoday.com