बॉलिवूड पाठोपाठ आता मराठी चित्रपटात दिसणार रत्नागिरीचा सुधीर घाणेकर

रत्नागिरीजवळ उशीसारख्या ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या सुधीर घाणेकर यांने थेट बॉलिवूडचा प्रवास केला आहे.गावात उत्सवात होणाऱ्या नमन मध्ये गोमू व गोकुळाच्या रोलपासून सुरुवात करणाऱ्या सुधीर याने बॉलीवूडमध्ये एक चित्रपट केला आहे. त्याचप्रमाणे आता तो मराठी चित्रपटात दिसणार आहे. बुद्धिजीवी व रामरायाचे निस्सीम भक्त असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित श्रीराम समर्थ या चित्रपटात सुधीर काम करत आहे.या चित्रपटामध्ये सुधीर अभिनयाबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम पाहत आहे.१ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला.या अगोदर सुधीर घाणेकर याने हिंदी चित्रपट सृष्टीत पॅनल्टी या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.कोकणाच नाव उंचावणाऱ्या सुधीरवर सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button