शृंगारतळी येथील मालाणी मार्ट चोरट्यांनी फोडले
गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शुंगारतळीयेथील मालानी मार्ट चोरट्यानी फोडले व त्यातील रोख रक्कम व दोन लाखांचा माल लांबविला शृंगारतळी या भागातील महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ आहे. या शुंगारतळीत नेहमीच सणासुदीला बाजारपेठेत खूप गर्दी असते त्यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानात सामान भरत असतो याचाच फायदा घेऊन दिवाळीच्या आदल्या दिवशी शृंगारतळी येथील प्रसिद्ध व्यापारी नासिम मालाणी यांच्या मालाणी मार्ट मध्ये मागच्या दराने प्रवेश करत चोरी केली . त्यामध्ये जवळपास एक लाख 80 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. ज्यांनी चोरी केली ते चार चोर मालाणी आर्ट मधील सीसीटीव्हीत कैद झालेत.
या चोरीच्या तपासासाठी रत्नागिरीतून ठसा तज्ञ व स्वान पथक यांना पाचारण करण्यात आले असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. ऐन दिवाळीत ही चोरी झाल्यांने व्यापारी वर्गात खळबळ उडाली
www.konkantoday.com