बचतगटांच्या फराळ महोत्सवात साडेचार लाखांची उलाढाल
चिपळूण येथे महिला बचतगटाच्या फराळ महोत्सवात सहभागी २८ बचतगटांनी चार दिवसात साडेचार लाखांची उलाढाल केली. विशेष दिवाळीनिमित्त कोकणात आलेल्या परदेशी पर्यटकांनीही या महोत्सवाला भेट देत पदार्थांचा आस्वाद घेतला व दाद दिली. महिला बचतगटांंची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या पार्श्वभूमीवर उमेद प्रकल्पांतर्गत पंचायत समितीच्यावतीने प्रतिवर्षी फराळ महोत्सवाचे आयोजन केले जाते.
www.konkantoday.com