
देवाची चित्र असलेले व चीनी फटाक्यांची रत्नागिरीत विक्री नाही
फटाक्यांवरील देवतांच्या चित्रामुळे समस्त हिंदू धर्माच्या भावनिक भावना दुखावल्या जातात यामुळे अशा फटाक्यांची विक्री करू नये तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांमध्ये विषारी पदार्थाचे प्रमाण खूप असते त्यामुळे चिनी फटाक्यांची विक्री करू नये असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने व्यापाऱयांना केले होते त्याप्रमाणे त्याला पाठिंबा देत रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने अशा फटाक्यांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे
www.konkantoday.com