गणपतीपुळे, कोतवडे ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे

गणपतीपुळे ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विकासकामांच्या चौकशी व कोतवडे ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळे निर्लेखनावरून रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांनी पुन्हा प्रशासनाला जाब विचारला. ग्रामपंचायतीच्या कारभारावर उपस्थित झालेल्या तक्रारींबाबतचे अहवाल पं.स. प्रशासनाने संबंधित वरिष्ठांसमोर निर्णयासाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.या सभेत गणपतीपुळे ग्रा.पं. ने केलेल्या विकास कामांच्या चौकशीबाबत सदस्य गजानन पाटील यांनी प्रशासनासमोर स्पष्टीकरण मागितले हाेते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button