
जलदूत शाहनवाज शाह यांना जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांच्या हस्ते नदीसेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
गेली २५ वर्षे पर्यावरणासाठी मनोभावे काम करणाऱ्या जलदूत शाहनवाज शाह यांना जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग यांच्या हस्ते नदीसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डीबीजे महाविद्यालयात झालेल्या डीबीजे महाविद्यालयातील नदीकी पाठशाला या कार्यशाळेत नदीसेवक पुरस्काराने शाहनवाज शाह यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरण अभ्यासक शाह यांनी वाशिष्ठी व जगबुडी नदी, तिच्या उपनद्या यांचा उगमापासून मुखापर्यंत नदीचे नैसर्गिक जलस्रोत, पाणलोट क्षेत्र, भौतिक बदल, पर्यावरणीय बदल, जैवविविधता, वहनक्षमता याचा गेली अनेक वर्षे अभ्यास करत आहेत. त्यांनी पर्यावरणासाठी वेळोवेळी विविध आंदोलने,उपोषणे केलेली आहेत. विविध ठिकाणी असणारे नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित करण्याचे तसेच त्यांचे जतन करण्याचे कार्य केले आहे. चिपळूण शहरातील नारायण तलाव हा पूर्णपणे बुजलेला होता, नष्ट झालेला होता. ग्लोबल टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी प्रथम त्याची कागदपत्रे पूर्ण केली. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे पाठपुरावा करून पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मिळवून दिला. प्रथम हा तलाव पुनर्जीवित करून त्याच्या बाजूने संरक्षक भिंतबांधून घेतली तसेच सरोवर संवर्धनअंतर्गत ३ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव मंजूर करवून घेतला. महसूल व वनविभागाने चला जाणूया नदीला हे अभियान राबवण्याचे ठरविले. या अभियानात शाह यांची नदीप्रहरी म्हणून नियुक्ती करून वाशिष्ठी, जगबुडी नदीची जबाबदारी दिली. या सर्व जबाबदाऱ्या ते विनामूल्य स्वखर्चाने करत आहेत. या सोबतच नाम फाउंडेशननेसुद्धा आपल्या संस्थेशी जोडून घेतलेwww.konkantoday.com