जुन्या आंबा बागांच्या पुनर्रर्जीवनासाठी दीड कोटीचा निधी
राष्ट्रीय फलोद्यान अभियानांतर्गत भारत-इस्त्रो कृती आराखड्यानुसार जुन्या आंबा बागांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १८०० शेतकर्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. ७२९.७० हेक्टर क्षेत्रावरील बागांचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी ४५ लाख ११ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जुन्या आंबा बागांच्या पुनरूज्जीवनासाठी शिफारस केली आहे.
www.konkantoay.com