
रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरी मंदिरात शनिवारी कालभैरव जयंती
रत्नागिरी : रत्नागिरीचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वर मंदिरामध्ये कालभैरव जयंतीनिमित्त उद्या (२३ नोव्हेंबर) विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिरात सकाळी ७.३० वाजता गावाच्या वतीने अभिषेक, सकाळी ९ नंतर होम हवन, सत्यनारायण महापूजा, आरती, असे धार्मिक कार्यक्रम होतील. ९.३० वाजता कालभैरवाष्टक पठण, दुपारी १२ वाजता महाप्रसाद वाटप, दुपारी १२ ते २ या वेळेत श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ (भांडूप) यांचे बुवा मुकेश लोकरे व सहकाऱ्यांचे भजन होईल.दुपारी २ ते ३.३० या वेळेत श्री स्वामी समर्थ भजन मंडळ (केळ्ये, बुवा उदय मेस्त्री व दीनानाथ बारगोडे) यांचे भजन होईल. दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत बुवा प्रवीण मुळ्ये कालभैरव जयंतीनिमित्त कीर्तन सादर करतील.
संध्याकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत श्री दुर्गमाता महिला भजन मंडळ (कर्ला, बुवा सौ. नेहा शेट्ये व संगीता सावंत), संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ (कोतवडे, बुवा विजय मयेकर), रात्री ८ ते १० या वेळेत श्री दत्तगुरु सेवा मंडळ (रत्नागिरी, बुवा गुरुप्रसाद जोशी), रात्री १० ते १२ या वेळेत दत्तप्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार, बुवा सुदेश नागवेकर) यांची सुश्राव्य भजने होणार आहेत. रात्री १२ वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमात रत्नागिरीकरांनी व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानने केले आहे.