स्वरूपानंद पतसंस्थेत दसरा दिवाळी ठेव योजनेत साडेचार कोटी जमा

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेला उदंड प्रतिसाद प्राप्त झाला. योजनेत आजपर्यंत 4.50 कोटी गुंतवणूक जमा झाली. संस्थेच्या ठेवी आता 185.93 कोटी झाल्या, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेचे अजून 3 दिवस बाकी आहेत. या योजनेत मोठी गुंतवणूक करा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वरूपानंद संस्थेच्या ठेवी 200 कोटी होण्याकरिता अजून 15 कोटींचा टप्पा पार करायला आहे. मार्चअखेरीपर्यंत 200 कोटींचा टप्पा पूर्ण होईल, असा विश्‍वास अ‍ॅड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आर्थिक जगतात खूप अस्थिरता आहे, पण पतसंस्थेने जागृत राहत कर्ज धोरण राबवले आहे. मंदीच्या या युगातही संस्थेने केलेल्या योग्य कर्ज पुरवठ्याच्या व सतर्क पाठपुराव्याच्या बळावर 99.99 टक्के वसुलीचे प्रमाण कायम राखले आहे. संस्थेच्या सर्व म्हणजे 80 कोटींच्या गुंतवणुका कायद्यानुसार बँकेत आहेत. आर्थिक शिस्त, प्रामाणिक व्यवहार, अचूकता वक्तशीरपणा यामुळेच 17 शाखा उत्तम पद्धतीने सुरू आहेत. सध्या संस्थेत अधिकारी, कर्मचारी 100 हून अधिक कार्यरत आहेत. सभासद संख्या 30 हजारच्या पुढे पोहोचली आहे.
आर्थिक व्यवहारात कॉस्टला महत्व असते. अलीकडचा कालखंड उतरता व्याजाचा आहे, ठेव व्याज दर, कर्ज व्याजदर कमी होत आहेत. स्वाभाविकपणे पतसंस्थेचे व्याजदर उतरत आहेत. स्वरूपानंद पतसंस्थेने अर्थजगताचा आढावा घेत व्याजदर ठरवले. कधीही अतिरेकी व्याजदर ठेऊन ठेवीदारांना आकर्षित केले नाही. ठेव सुरक्षित करणे आणि त्यावर परतावा देणे हे कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आमची आहे. आर्थिक सक्षमता अबाधित राखत सक्षमता आणि संरक्षण याबाबत तडजोड न करता ठेव व्याजदर संस्था ठरवत आली. ग्राहकांनी आपला कष्टाचा पैसा मोठ्या विश्वासाने स्वरूपानंदमध्ये गुंतवला आहे, याची जाणीव संस्थाचालक म्हणून आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आज महाराष्ट्रातल्या यशस्वी पतसंस्थांमध्ये अग्रस्थानी आहे हे यश हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी स्वामी स्वरूपानंदांच अधिष्ठान सदैव पाठीशी राहील, असे पटवर्धन म्हणाले.

आर्थिक स्थिती मजबूत

ठेवी – 185 कोटी 22 लाख, कर्ज – 130 कोटी 22 लाख, गुंतवणूक – 80 कोटी 70 लाख, निव्वळ नफा – 3 कोटी 12 लाख, थकबाकीचे प्रमाण – 0.13 टक्के, सी.डी. रेशो – 61.71 टक्के, स्वनिधी – 23 कोटी 14 लाख, खेळते भांडवल – 216 कोटी 76 लाख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button