रत्नागिरी शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस,समुद्रही खवळला
रत्नागिरी शहरात सकाळी पावसाने विश्रांती घेऊन थोडेफार सूर्यदर्शन दिले असतानाच परत एकदा मुसळधार पावसाने जोर केला आहे.शहरात वादळी पाऊस कोसळत आहे.यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्यांना त्याचा फटका बसला आहे .जोरदार वार्यासह पाऊस कोसळत असल्याने बाजारपेठेतही दुकानदारांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे .वादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्रातही मोठ्या लाटा उसळल्या असून अनेक मच्छीमारी नौकांनी समुद्र किनारे गाठले आहेत.यामुळे मच्छीमारी देखील ठप्प झाली आहे .रत्नागिरी शहर परिसरात पावसाने काळोखी वातावरण केले असून पावसाचा जोर वाढत आहे .प्रशासनाने देखील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे
www.konkantoday.com