भात पिकाच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी-दीपक पटवर्धन
अतिरेकी पावसामुळे रत्नागिरी जित्हयात झालेल्या भातपीकाच्या अनन्वीत नुकसानीची पहाणी करुन भरपाई मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांनकडे पत्राद्वारे केली.याबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला असून मुख्य सचिवांना या संदर्भामध्ये ते पत्र देणार आहेत असे सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचे पत्र
प्रती,
मा.देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
महोदय,
रत्नागिरी जिल्हयात गेले १५ दिवस भरपूर पाऊस पडत आहे. दसर्यानंतर रत्नागिरीतील
भात पीक तयार होते व त्याची कापणी करावी लागते. मात्र पाऊस लांबल्याने शेतात तयार असलेले भात पिक फूकट गेले आहे. ज्या शेतकर्यांनी पावसाची उघडीक पाहून कापणी केली व भात सुकवण्यासाठी ठेवले ते भात ही पावसाने फुकट गेले. या पावसामुळे रत्नागिरी जिल्हयातील भात पिकवणार्या शेतकर्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे.निवडणूक प्रक्रीया सुरु असल्याने याकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नाही परिणामी झालेल्या नुकसानीची पहाणी व पंचनामे झालेले नाहीत. झालेल्या प्रचंड नुकसानीकडे मी आपले
लक्ष वेधत आहे. रत्नागिरी जिल्हयातील भात पिकाची झालेली नुकसानी पहाता तातडीने शासकीय
यंत्रणेने पहाणी करुन पंचनामे करण्याबाबत आपण आदेश दयावेत तसेच या नुकसानीची पहाणी होवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण उचीत ते आदेश करावेत.आचारसंहिता चालू असल्याने निर्णयावर मर्यादा आहेत याची कल्पना आहे मात्र ही
परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे आवश्यकतर निवडणूक आयोगाची विषेश परवानगी घेवून नुकसानग्रस्त
भात शेतीची पहाणी व त्या अनुषंगाने नुकसान भरपाई बाबत निर्णय घ्यावा यासाठी हे विनंती पत्र
आपणाकडे रत्नागिरी सिंधूदुर्गाचे भा.ज.पा प्रभारी आमदार प्रसादजी लाड साहेब यांचे मार्फत आपणाला
पाठवीत आहे.
कृपया उचित कारवाई तातडीने करावी ही नम्र विनंती.
दीपक पटवर्धन,
भाजपा जिल्हाध्यक्ष,
रत्नागिरी.