
गुहागरमध्ये राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांच्या घरावर दगडफेक
गुहागर मतदार संघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार भास्करराव जाधव यांच्या विजयी मिरवणुकीच्या दरम्याने पाचेरीआगर गुरववाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुका अध्यक्ष तथा कुणबी समाजाचे नेते रामचंद्र हुमणे यांच्या घरावर अज्ञात इसमाने तुफान दगडफेक केली यामुळे घराचे नुकसान झाले आहे या सर्व प्रकरणाबाबत गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
www.konkantoday.com