
श्री देव भैरी मंदिराच्या प्रांगणात रंगणार भक्ती स्वरलहरी!
दिपावलीनिमित्त श्री देव भैरी भक्ती दिपसंध्या अंजली प्रस्तुत भैरी मंदिराच्या प्रांरणात २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. करण्यात आली आहे.रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायिका संध्या सुर्वे, अंजली लिमये, नरेंद्र रानडे, राम तांबे, विनय वळामे, मीरा भावे, चैतन्य पटवर्धन या गायकांचे गीतगायन सादर होणार आहे. पांडुरंग बर्वे यांची तबलासाथ तर मंगेश चव्हाण यांची पखवाज साथ या गायकांना लाभणार आहे. कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था राजू बर्वे पाहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई-पावणाई तृणबिंदूकेश्वर ट्रस्ट, झाडगांव रत्नागिरी यांच्यावतीने करण्यात आले आहे
www.konkantoday.com