उदय सामंत लवकरच पोलखोल करणार, प्रशासनाबद्दल नाराजी
माझे मताधिक्य कमी व्हावे, म्हणून काही घटना जाणीवपूर्वक घडविण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, मी विक्रमी मताधिक्याने निवडून आलो. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांच्याविरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार झाली. मात्र, मी पहिल्यांदा उघड करतोय की जिल्हाधिकार्यांच्या लेटरहेडवरून ही तक्रार झाली. देवेंद्र अ. नार्वेकर या नावाने तक्रार आहे. रत्नागिरीत असा कोणताही नार्वेकर नाही. कोणत्या कार्यालयात बसून हे उद्योग कोणी केले, हे मी शोधून काढणार आहे. ही प्रवृत्ती चांगली नाही. लवकरच याची पोलखोल उदय सामंत यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी २८ व्या वर्षापासून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या प्रक्रिया माहित आहेत. तरी देखील जिल्हा प्रशासनाने माझ्या कार्यकर्त्यांना नोटीसा काढून जाणुनबुजून त्रास दिला. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदान केंद्रांवरील मशिन धिम्या गतीने तर काही ठिकाणी अकार्यक्षम अधिकार्यांमुळे ग्रामीण भागात मतदानाचा टक्का घसरला. प्रशासकीय अधिकार्यांनी निपक्षपणे काम करणे गरजेचे होते पण तसे झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
www.konkantoday.com