
रत्नागिरी शहरातील धनजीनाका येथे घरफोडीत लाखांहून अधिक रक्कम चोरीस
रत्नागिरी शहरातील धनजीनाका येथे एका घराच्या किचनच्या उघड्या खिडकीतून घरात घुसखोरी करत चोरट्याने १ लाख १६ हजार ५०० रोख रक्कम लांबवली आहे. शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे ते १८ मे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धनजीनाका आंबेडकर रोड येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने येथील घर नं. २५४३ ए, धनजीनाका-आंबेडकर रोडवरील किचनजवळील उघड्या खिडकीतून घरात प्रवेश केला. घरातील १ लाख १६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम पळवली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com