
मठ येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानची दानपेटी चोरट्यांनी फोडली
लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात दुकाने व घरफोड्या करणार्या चोरट्यांनी आपला मोर्चा आता देवस्थानकडे वळविला असून लांजा तालुक्यातील मठ येथे असलेल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानात प्रवेश करून गाभार्याची कडी कुलपे तोडून गाभार्यात ठेवलेली दानपेटी व बाहेर ठेवलेली दानपेटी फोडून त्यातील अंदाजे १२ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. याबाबत देवस्थानचे सुधाकर चांदोरकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com