
मस्य विद्यालयासाठी आमदार राजन साळवी यांनी नामदार जानकरांकडे आग्रह धरला
मस्य विद्यालय कोकणात कायम ठेवावे अशी आग्रही मागणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार महादेव जानकर यांच्याकडे केली .डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट घालण्यात आला आहे.त्याला संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध सुरू झाला आहे. याशिवाय या महाविद्यालयातून शिकलेल्या बाराशे पदवी धारकांवर पदवीचे संकट निर्माण झाले आहे याबाबत साळवी यांनी जानकर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली.