
नियम डावलून रस्त्यावर फिरणारी ७७३ वाहने जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात जप्त
रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आव्हान केलेले असतानाही नियम डावलून रस्त्यावर फिरणारी ७७३ वाहने जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात जप्त करण्यात आली आहेत. तर गुहागर पोलिसांनी सर्वाधिक १७३ वाहने जप्त केली. जिल्हा वाहतूक शाखेने १५९ वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच गाड्या मालकांना परत केल्या जाणार आहेत.
www.konkantoday.com